11 फेब्रूवारी ला, स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक वितरण समारंभ, दोन्ही जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट पत्रकारिता, सामाजिक संस्था, कृषि व खेळात नाविन्याबद्दल होणार सम्मानित | Gondia Today

Share Post

Polish 20240209 192040331 587744 CS 6873Polish 20240209 192040331 587744 CS 6873

गोंदिया। हर मन के मित भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील स्व. नाम धन्य नेता मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त दि.११ फेब्रुवारी २०२४ रविवारला सकाळी ११.०० वाजता स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदियाच्या पटांगणात स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या समारंभात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एस.एस.सी, एच.एच.सी, पदवी, पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजसेवी संस्था, उत्कृष्ट शेतकरी, ज्येष्ठ पत्रकार व उत्कृष्ट खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Polish 20240209 192040331 587744 CS 6873 1Polish 20240209 192040331 587744 CS 6873 1

कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून उपाध्यक्ष माननीय श्री जगदीप धनखर, राज्याचे राज्यपाल माननीय श्री रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, राज्यमंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री धर्मरावबाबा आत्राम व भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वर्ण पदक वितरण समारोह कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवाणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्था च्या वतीने श्रीमती वर्षाताई पटेल, माजी आमदार श्री हरिहरभाई पटेल व माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केली आहे.