☘ टाकळा (टायकाळो)☘…
Contact for Consultation
– डॉ.संजीव लिंगवत, संपर्क: 9421268268
डॉ.सई लिंगवत, वंध्यत्व स्त्रीरोग चिकित्सक
आयुर्वेद होमिओपॅथी क्लिनिक,वेंगुर्ले,सिंधुदुर्ग.
पावसाळ्यात येणारी व कोकणातील रानटी पालेभाज्या मध्ये मोडणारी बहुगुणी वनस्पती…
टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो.
त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. या वनस्पतीच्या पाने, बीज, मुळ व खोड राजस्थान व गुजरात मध्ये औषधं निर्मिती साठी वापरतात. टाकळा म्हणजे ‘ कॅशिया टोला ‘ शेंग वर्गीय वनस्पती असून या वनस्पतीला तोटा किंवा तरवड पण म्हणतात.
▪ वैशिष्ट्ये
* उग्र वास असल्याने जनावर खात नाही.
* जमिनी नुसार ३० ते १०० सेंटिमीटर वाढतात.
* मेथीच्या आकाराची संयुक्त पाने असतात.
* खोड गुळगुळीत असतात.
🛑 औषधी गुणधर्म:
रेचक, द्रवकारक, जंतुनाशक, तापहारक, हृदयरोग व लिव्हर साठी उत्तम, अपचनासाठी व अनियमित मासिक पाळी साठी परिणामकारक .गांधीलमाशी किंवा अन्य कीटक दंश झाल्यास टाकल्याची पाने चोळून दंशाच्या जागी लावल्यास दाह कमी होतो व बरे वाटते.
🛑 उपयोग:
पाने,बी, मुळं औषध निर्मिती साठी, कोवळ्या पानांचा भाजी साठी वापर, भाजलेल्या बियां कॅफी तयार करण्यासाठी वापरतात. याच्या बियां खोबऱ्याच्या रसात कालवून दिवाळीसाठी उटणे पण तयार करतात.
🛑 पारंपरिक वापर
▪झाडाचा वापर जंतू नाशक पेयांसाठी▪पानेज्ञव बिया त्वचा रोगा साठी ▪ कावीळ,▪ रक्तदाब, ▪पोटदुखी,▪ रात आंधळे पणा ▪वात विकार व खोकल्यावर पानांचा काढा
🛑 इतर उपयोग
▪ पानांचा रस किटकनाशके म्हणून
▪बियांचा वापर पशुखाद्य, रुम फ्रेशनर,
▪ बुरशीनाशक, रोगप्रतिबंधक औषध, मेंदू आजारांवर उपयुक्त
▪भाजी पचायला हलकि, तुरट , पित्तशामक ,मलसारक
🛑 बियांतील औषधी घटक: टॅनिन, रंगद्रव्य, ॲलिफॅटीक ॲसिड, ॲन्थ्रक्विनोन, सॅपोनिनस, ग्लुकोसेनिन, फायटोस्टेरिन व जलांश पानातील औषधी घटक: प्रथिने, जलांश, तंतु, राख,मेद, पिष्टमय, कॅल्शियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम,झिंक, मॅगेनीझ, कोबाल्ट, पोटॅशियम इत्यादी.
🛑 पाककृती:
कोवळ्या पानांची भाजी साहित्य २-३ वाट्या कोवळी पाने, २-३ बारीक चिरलेले कांदे, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ बारीक ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ. कृती प्रथम कोवळी पाने चांगली निवडून स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला वाफेवर शिजवून व थंड झाल्यावर पिळून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी व लसणाची फोडणी तयार करावी. नंतर कांदा तेलात चांगला परतवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व वरील भाजी टाकून चांगली वाफवून घ्यावी.
चवीनुसार किसलेले ओलं खोबरं किंवा शेंगदाणा कुट घालणे. कांदा जास्त वापरल्यास भाजी रूचकर होते. घरी तयार केलेलं शुद्ध खोबरेल तेल गरमागरम भाजी वर घालल्यास, भाकरी सोबत खायला हि भाजी अधिक रुचकर लागते.
टीप: पावसाच्या पहिल्या सरीनंतर टाकळ्याची दोन-दोन पाने वर येताना दिसतात. तीच पाने भाजी करण्यासाठी योग्य असतात. टाकळ्याच्या बियांना भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो म्हणून भविष्यात हा कॉफीला उत्तम पर्याय होऊ शकतो.