डॉ.संजीव लिंगवत : किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन हत्यार, लेणी, गुहा, प्राचीन नाणी हा ऐतिहासि क ठेवा असुन या ऐतिहासिक वास्तू जतन , संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुरातत्त्व संशोधन महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात.
भारत देशाला व महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. महाराष्ट्र राज्यात जवळपास साडेतीनशे ते चारशे किल्ले असुन सिंधुदुर्ग जिल्हात जवळपास ३२ किल्ले आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक गावात प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक ठेवे आहेत. या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन संवर्धन, संरक्षण बाबतीत सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामिल करून समाजात या वास्तू व साधनांचे महत्त्व पटवून देऊन समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे. भविष्यात महाराष्ट्र राज्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पुरातन वास्तू संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवकांची फळी उभारण्यासाठी आपणं प्रयत्नशील राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले वाचवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी प्रतिनिधी समोर व्यक्त केले. नुकतीच महाराष्ट्र राज्य, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय शासन निर्णय अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक जतन व संवर्धन महावारसा समिती, सिंधुदुर्ग वर सदस्य म्हणून नुकतीच डॉ.संजीव लिंगवत यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जाहीर केला त्या निमित्ताने प्रतिनिधी समोर त्यांनी हे विचार स्पष्ट केले.
डॉ.संजीव लक्ष्मण लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले संवर्धन व संरक्षणासाठी गेली पंधरा ते वीस वर्षे सातत्याने जनजागृती करत आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील यशवंत गड, वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार, निवती किल्ला स्वच्छता मोहिमे सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच किल्ल्यांवर त्यानी स्वच्छता मोहीमा राबविल्या आहेत. रेडी येथील यशवंत गड किल्ल्यांवरील खाजगी मालमत्ता बोर्ड तसेच अवैध बांधकाम रोखण्यासाठी व हटविण्यात यशवंत गड शिवप्रेमीं सोबत भुमिका बजावली असू भारत देशातील साधारण दोनशे किल्ल्यांना भेटी देऊन पाहणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले वाचवण्यासाठी पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व जिल्हाधिकारी तसेच स्थानिक शिवप्रेमी यांचे लक्ष वेधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. राष्ट्रिय चॅनल ND natinal वर किल्ले बाबतीत थोडक्यात मुलाखत त्याची प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील इतिहास लेखन विश्वास पाटील सारख्या लेखकाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले दाखवून लिखाणासाठी सहकार्य केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले व त्यांचे स्वराज्यासाठी योगदान आदी विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. किल्ले पर्यटन वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन पद्मश्री परशुराम गंगावणे आदी महनीय व्यक्ती तसेच गोवा विद्यापीठ येथील डॉक्टरेक करणारे विद्यार्थी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले दाखविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रकाश नारकर, पत्रकार विजय शेट्टी, पत्रकार के. जी गावडे यांच्या सोबत Discovery of sindhudurg या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन वास्तू, मंदिर, वीरगळ शोधण्यासाठी प्रयत्नशील केले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तरूण शिवप्रेमी यांना एकत्र करून किल्ले संरक्षण व संवर्धन , सिंधुदुर्ग घ्या माध्यमातून सर्व किल्ले स्वच्छता मोहीमा राबविण्यात प्रयत्न केला असुन किल्ले व पुरातन वास्तू पर्यटन या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचा उपाध्यक्ष असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ले गिर्यारोहण साठी कार्यरत आहेत . कोकण इतिहास परिषदेचा सक्रिय कार्यकर्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले , किल्ले पर्यटन या विषयावर व्याख्यान दिली असून वेंगुर्ले येथील वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील तसेच जागतिक दर्जाच्या सिध्दार्थ वर्धराजन यांच्या The wire या वेबसाईटवर वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार वर पाच हजार शब्दांत लेख प्रसिद्ध करण्यासाठी रुबेन मालेकर या पत्रकाराला मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन वास्तू वर डॉक्टरेट करणारऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक व डॉक्टरेट करणारे विद्यार्थी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर मार्गदर्शन कार्यशाळा घेतली आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी प्राधिकरण आपत्कालीन समितीचे ते सदस्य असुन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती महावारसा समिती वर करण्यात आलेली आहे. जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले संवर्धन व संरक्षण करत असताना महाराष्ट्रा राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांनी अवयव दान व देहदान विषयावर मार्गदर्शन, लैंगिक समस्या कार्यशाळा, कृषी मेळावे, रक्तदान व आरोग्य मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा, कर्करोग जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम आदी कार्यक्रम राबविले असुन सधना नसलेल्या भगिनीं साठी हळदी कुंकू व काही धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट व चुकीच्या प्रथा विरोधी आवाज उठवला आहे. डॉ.संजीव लिंगवत यांचं सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महनीय असून त्यांनी अजून पर्यंत भारत सरकारचा नेहरू युवा पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, कोंकणरत्न पुरस्कार, राष्ट्रीय वैद्यकीय सेवा पुरस्कार आदी पुरस्कार मिळविलेले असुन गोंदिया जिल्ह्यातील निवृत्त वन अधिकारी विठ्ठलराव मेश्राम यांचे ते जावं ई असुन तिरोडा येथील सुप्रसिध्द द्या हाॅस्पिटलचे संचालक सर्जन डॉ. संदिप मेश्राम यांचे ते भावोजी आहेत.