राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे

Share Post

मुंबई, 17 ऑक्टोबर (UNI) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मंगळवारी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

18 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

तर दिंडोरी, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना या इतर मतदारसंघांचा आढावा 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही तपासे यांनी सांगितले.

UNI VKB SS