पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या खासगी संस्थेतील प्राध्यापकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमित सिरमनवर (वय २८, रा. बालेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात रवाना, ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी
आणखी वाचा

प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने शिक्षिकेकडून विचित्र शिक्षा, विद्यार्थी नैराश्येत गेल्यानंतर प्रकरण उजेडात!

भिवंडीत विद्यार्थ्याला कॅापी करु दिली नाही म्हणून उपप्राचार्यांना धमकी

वर्धा : लाजवाब! बाजरीची आंबिल, ज्वारीच्या घुगऱ्या, नाचणीची लापसी, राजगिऱ्याची कचोरी… तृणधान्याच्या खाद्यजत्रेबद्दल जाणून घ्या

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांला अधीक्षकाकडून बेदम मारहाण
तक्रारदार तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ती माॅडेल काॅलनीतील एका संस्थेत जायची. आरोपी सिरमनवरने तरुणीशी अश्लील वर्तन केले. तिला छडी मारुन घरातील कामे करण्यास सांगितले. तरुणीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.