दिवसेंदिवस डायबिटीस रूग वाढत असून व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. यामुळे आपली चयापचय क्रिया देखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.
जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल. जेवनावर नियंत्रण ठेवा जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो. नंतर बराच वेळ काहीही खात नाही. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या.
धूम्रपान करू नका. असे प्रतिपादन डॉ. निलेश पाटील यांनी वेर्ले येथील डॉ. लिंगवत क्लिनिक येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या मधुमेह आरोग्य तपासणी शिबिरात केले. यावेळी ७६ व्यक्तींची मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन करुन बादेकार तरूण मंडळाचे सचिव प्रसाद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुभाष राऊळ, प्रगतशील शेतकरी लाडजी राऊळ , वेर्ले विविध कार्यकारी सोसायटीचे चंद्रकांत राऊळ, शिरशिंगे गावचे गणपत राणे , पांडुरंग राऊळ, पोलीस पाटील अरुण लिंगवत बादेकार मंडळाचे प्रकाश मर्गज, अनिल गावडे, सुनील राऊळ, सुरेश गावडे, अशोक गोसावी, संदीप राऊळ , प्रशांत घोगळे, जेष्ठ नागरिक वसंत विठ्ठल राऊत, दाजी घोगळे , प्रतीक गावडे, जानदेव लिंगवत, मधुकर राऊळ, व्दारका लिंगवत, अश्विनी गोसावी, वसंत मोरचकर, रत्नमाला राऊळ , अर्चना चाफेकर उपस्थित होते. आरोग्य शिबीरात डॉ. निलेश पाटील, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. सई लिंगवत यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बादेकार युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष योगदान दिले. स्वागत प्रसाद गावडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश मर्गज यांनी केले.
आरोग्य शिबीराचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटनप्रसंगी प्रसाद गावडे, अरुण लिंगवत, सुभाष राऊळ,लाढजी राऊळ, चंद्रकांत राऊळ, अशोक गोसावी इत्यादी