गोंदिया. 20 डिसेंबर
गोंदिया. आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्त हेल्पिंग हँड्स क्लिनिक आणि सहयोग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्पिंग हँड्स फ्री क्लिनिकमध्ये 19 डिसेंबर रोजी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सहयोग हॉस्पिटलच्या ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञांनी लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत लाभ दिला.
या नेत्र तपासणी शिबिरात गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार समशेर खान पठाण, सहयोग ग्रुपचे संचालक जयेश रामाडे सर, अतिरिक्त तहसीलदार सोनवणे सर, पंकजभाऊ यादव, नायब तहसीलदार एम.एस.चौरे, नानू मुदलियार, सरफराज गोडील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या नेत्र तपासणी शिबिरात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन परवेझ जाफर बेग मिर्झा यांनी केले तर आभार प्रदर्शन नजीर शेख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अफरोज शेख, आबिद शेख सर, शाहिद भाई अन्सारी, सोनू शेख, शमीन शेख, माँटी भाई, अज्जू भाई, मैनु भाई चौहान, जावेद भाई कुरेशी, शाहरुख खा पठाण आदींनी सहकार्य केले.