

प्रतिनिधी.
गोंदिया. खमारीनंतर आता रावणवाडी येथे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या 24 जुलै रोजी करण्यात आले आहे.
रावणवाडी येथील माता मंदिर संकुलात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, गोंदिया आणि महात्मे नेत्र रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात होणार आहे. आणि दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या लोकांसाठी नागपुरात वाहतूक आणि जेवणाची व्यवस्था मोफत असेल. लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स आणि मूळ प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, गोंदिया व महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.