३६३ दृश्ये
तिरोडा (१०) – गोंदिया तुमसर रोडवरील एचपी गॅस एजन्सीजवळ असलेल्या श्री साई ऑटोमोबाईल या दुकानाला ९ तारखेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागून दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.
निखिल बैंस यांच्या श्री साई ऑटोमोबाईल या दुकानाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुकानात ठेवलेला 80 ते 90 लाख रुपयांचा माल पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अदानी व नगर परिषद तिरोडा यांच्या अग्निशमन दलाने मदत केली. आग इतकी भीषण होती की समोरचे शटर उघडणे कठीण झाले होते. मागील भिंत तोडून आग विझवण्यात आली. निखिल बैस यांनी शासनाकडून मदतीचे आवाहन केले आहे.