भंडारा अपघात भंडारा न्यूज : भंडारा येथे भीषण अपघात, दोन ट्रकची धडक, एक जखमी. Gondia Today (Gondia Today) | Gondia Today

Share Post

भंडारा अपघात

लोड करत आहे

भंडारा, भरधाव वेगात व निष्काळजीपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला.ही घटना 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 मोहघाटा वनपरिक्षेत्रात घडली. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.महामार्ग पोलीस व साकोली पोलीस यांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. शंकरलाल खरोळे (वय 35, रा. भिलेवाडा शाहपूर (राजस्थान) असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक क्र. GJ 14 Z 2177 हा भंडारा येथून साकोलीकडे जात असताना ट्रक क्र. आरजे 27 सीजी 3847 क्रमांकाच्या चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या अपघाताची माहिती साकोली पोलिसांसह महामार्ग वाहतूक पोलिसांना दिली.

क्षणाचाही विलंब न लावता महामार्ग पोलिस हेल्प डेस्कचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे, सहायक फौजदार पवनकर, पोलिस नाईक ईश्वरकर, उपरीकर, पोलिस हवालदार सातकर यांनी घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्त ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकला होता, त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हायड्राच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक महामार्गाच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.