गोंदिया. (02 फेब्रुवारी)
गोंदिया जिल्ह्यातील तसेच परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. गोंदिया येथे असलेले वैद्यकीय महाविद्यालय पहिल्यापासूनच केटीएस रुग्णालय आणि बाई गंगाबाई येथे सुरू झाले. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने हे काम लवकर सुरू व्हावे यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता आणि इमारत बांधकामासाठी केंद्र सरकारकडून निधीची उपलब्धता यासह इतर सर्व प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखर, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय रमेश बैस, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल. , माननीय मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री माननीय धरमरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत.राहणार आहेत.
सदैव विकासकामांसाठी झटणारे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांना यश आले. खासदार श्री पटेल यांचा जिल्ह्यातील नागरिकांकडून सत्कार करण्यात येत आहे.