

10 जुलै 2024
गोंदिया : सामान्य डब्यांच्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित डबे वाढविण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत आता ऑक्टोबर महिन्यापासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ट्रेनमधील जनरल डब्यांची संख्या वाढवल्याने दुसऱ्या वर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय जनरल डब्यातील प्रवाशांचा वाढता ताणही बऱ्याच अंशी कमी होईल. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आनंददायी आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
*तपशील पुढीलप्रमाणे -*
⏩ 26 ऑक्टोबर 2024 पासून 13425 मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेसमध्ये आणि 28 ऑक्टोबर 2024 पासून 13426 सुरत-मालदा टाउन एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 07 डिसेंबर 2024 पासून 22512 कामाख्या-एलटीटी एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा आणि 10 डिसेंबर 2024 पासून 22511 एलटीटी-कामाख्या एक्सप्रेसमध्ये उपलब्ध असेल.
⏩ 29 नोव्हेंबर 2024 पासून 20857 पुरी-साई नगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये आणि 01 डिसेंबर 2024 पासून 20858 साई नगर शिर्डी-पुरी एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 26 नोव्हेंबर 2024 पासून 22866 पुरी-LTT एक्सप्रेसमध्ये आणि 28 नोव्हेंबर 2024 पासून 22865 LTT-पुरी एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 20813 पुरी-जोधपूर एक्सप्रेसमध्ये 27 नोव्हेंबर 2024 पासून आणि 20814 जोधपूर-पुरी एक्सप्रेसमध्ये 30 नोव्हेंबर 2024 पासून 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 04 सामान्य डब्यांची सुविधा 12807 विशाखापट्टणम – निजामुद्दीन समता एक्सप्रेसमध्ये 19 नोव्हेंबर 2024 पासून आणि 20808 मध्ये निजामुद्दीन – विशाखापट्टणम समता एक्सप्रेस 21 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध असेल.
⏩ 24 नोव्हेंबर 2024 पासून 22847 विशाखापट्टणम-LTT एक्सप्रेसमध्ये आणि 26 नोव्हेंबर 2024 पासून 22848 LTT-विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 01 नोव्हेंबर 2024 पासून 17321 वास्कोडिग्मा-जसीडीह एक्स्प्रेसमध्ये 05 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल आणि 04 नोव्हेंबर 2024 पासून 17322 जसिडीह-वास्कोडिग्मा एक्सप्रेसमध्ये उपलब्ध असेल.
13 नोव्हेंबर 2024 पासून 12771 सिकंदराबाद-रायपूर एक्सप्रेसमध्ये आणि 14 नोव्हेंबर 2024 पासून 12772 रायपूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 17005 हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेसमध्ये 14 नोव्हेंबर 2024 पासून आणि 17006 रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेसमध्ये 17 नोव्हेंबर 2024 पासून 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.
⏩ 28 ऑक्टोबर 2024 पासून 12410 निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये आणि 30 ऑक्टोबर 2024 पासून 12409 रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध असेल.