दहा कोटीच्या महसूल घोटाळ्याची चौकशी करा-दणका युवा संघटन

Share Post

तिरोडा तालुक्यातील चांदोरी येथे घाटातील मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती चोरी होत असल्याचे निवेदन गावकरी तसेच दणका संघटनेचे  जिल्हाध्यक्ष कपिल भोंडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया तसेच तहसीलदार तिरोडा ,उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना दिले आहेत
सविस्तर वृत्त असे की गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चांदोरी  येथील वैनगंगा नदीपात्रातून अवैध्य वाळू उपसा करून अंदाजे दहा कोटी रुपयांचे महसुलीच्या घोटाळा संबंधित महसूल खात्याने अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला असे दिसून येत आहे तसेच अवैद्य रेती माफिया तलवारी व बंदुकीच्या जोरावर सर्रासपणे उपसा करीत आहेत गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी कोणतीही कारवाई केली नाही गोंदिया जिल्ह्यातील कोणतेही रेती घाट लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी नागपूरला होत असते त्यासाठी माफियाकडून संबंधित प्रशासनाला व स्थानिक लोकप्रतिनिधींना मोठ्या रकमेच्या देवाण-घेवाण करून हा सर्व खेळ त्यांच्या डोळ्यात सुरू आहे अनेक वेळा अनेक तक्रारी करून सुद्धा महसूल विभाग दुर्लक्ष का करतो? हा संशोधनाचा विषय असला तरी यातून कुणाकुणाला लक्ष्मीचे दर्शन होते काही देखील संशोधनाचा विषय आहे लिलाव नसताना उपसा झालेल्या जागेचा गौण खनिज विभागामार्फत मोजमाप करण्यात यावे व ज्या गट क्रमांकावर वाळूचा साठा जमा केल्या जात आहे त्याची चौकशी करून अंदाजे दहा कोटी रुपयाच्या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून वाळू माफियांवर फौजदारी गुन्हा करण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात यावा अन्यथा दणका युवा संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना युवा दणका संघटना यांच्याकडून सादर करण्यात आले आता अवद्य झालेल्या दहा कोटी रुपयांच्या घोटाळा करणाऱ्या रेती माफिया यावर कोणती कारवाई होते यांच्याकडे नागरिकांचे लक्ष आहे