“गंगाधर” झाले प्रदेश सरचिटणीस, प्रेम रहांगडाले यांच्याकडे NCP जिल्हाध्यक्षपदाची नवी कमान.. | Gondia Today

Share Post

Polish 20231213 191659309 712619 CS 6240


वार्ताहर 13 डिसेंबर
गोंदिया: एनसीपी च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशाने गोंदिया जिल्ह्याचे एनसीपी जिलाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच परशुरामकर यांना गडचिरोली निरक्षक म्हणुन पदभार देण्यात आला. रिक्त झाले NCP च्या पदावर तिरोडा तालुक्याचे तदफ़दार नेते प्रेमकुमार रहांगडाले यांची गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री जैन यांनी नवनियुक्त सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष यांना पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, किशोर तरोने, केतन तुरकर, यशवंत परशुरामकर, करण टेकाम दिलीप डोंगरे, राजेश तायवाडे, सुनील पटले शैलेश वासनिक, प्रतीक पारधी, शरभ मिश्रा, वामन गेडाम सहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.