गोंदिया: गोंदियात एक वेदनादायक रस्ता अपघात उघडकीस आला आहे. येथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना तवेरा कारचे नियंत्रण सुटून एका घरावर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरोरा तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे हा अपघात झाला. लग्नाची मिरवणूक घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला आणि चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर आदळली. या अपघातात दीड वर्षाच्या मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अनुराधा ठाकरे (55), छायाबाई इनावते (55), देवांश मुळे (वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना गोंदियातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.