नेत्रदीपक फटाके सह नूतन विद्यालयात रावणदहनाचा हजारोच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
गोंदिया। दसरा सण मोठया उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. असत्यावर सत्याच्या विजय प्राप्त करणारा हा मोठा दिवस आहे. वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन श्री प्रफुल पटेल यांनी केले
या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार श्री प्रफुल पटेलजी प्रमुख अतिथि माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते वीर सैनिक, शासकीय कर्मचारी व रेल्वे कर्मचारी का सत्कार यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दसहरा उत्सव समितीचे संयोजक नानू मुदलियार यांनी सिव्हील लाईन्स परिसरातील नूतन विद्यालयात आयोजित रावणदहनाच्या कार्यक्रमाची सलग २० वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे.
खा. श्री प्रफुल पटेलांनी दसऱ्याच्या सर्व जनतेला शुभेच्छा देत पुढे म्हणाले की, नवरात्र उत्सवात जगत् जननी देवीची पूजा मोठ्या आस्थेने करण्यात आली. नवरात्रीनंतर दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हटले जाते. त्यातच विजया दशमी निमित्त असत्या चे प्रतीक म्हणून रावणाच्या प्रतिकृतीच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा वर्षांनु वर्षापासून जोपासली जात आहे. व्यक्तींनी वाईट विचारांचा त्याग करून चांगले विचार आत्मसात करून आचरणात आणणे हेच या दिवसाचे महत्त्व असे मनोगत कार्यक्रम प्रसंगी श्री प्रफुल पटेल यांनी केले.
माजी आमदार राजेंद्र जैन, संयोजक नानू मुदलियार, देवेंद्रनाथ चौबे, मा. सविता मुदलियार, राधेश्याम मेंढे, पियुष मुदलियार, रोहित मुदलियार, राजा देशमुख, सोनू लाडे, कमलेश नशिने, अनिल यल्लूर, स्वप्नील पिल्ले, किरण वर्मा, दिव्या येल्लूर, पुष्पा देशमुख, युवराज नारनवरे, महेंद्र चंदराम श्रीवास्तव, महेंद्रसिंग श्रीवास्तव, राजेंद्र कवठे आदी उपस्थित होते. , व्ही.एस. पटले, पिंटू येळे, योगेश रामटेकर, पवन परियानी, लकी शुक्ला, संदीप कोटमकर, रवींद्र रहांगडाले, मोहित पांडे, प्रकाश आगासे, मनोहर बिसेन, मुकेश साहू, अशोक नशिने, मनोहर लाडे, दसरा उत्सव समितीचे महिला-पुरुष व शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते. नागरिक उपस्थित होते…. कार्यक्रमाचे संचालन निरज नागपुरे यांनी केले.
रावण दहन कार्यक्रमात श्री राम, सीता, लक्ष्मण, हनुमान की आकर्षक झाकी, मथुरा येथिल श्री राधा कृष्णा नृत्य व मोर एवं गोड़ा नृत्य व फटाक्यांची भव्य अतिषबाजी कार्यक्रमांचे आकर्षण ठरली.