26 रोजी देवरी येथे दि ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन, 27 रोजी डीपीसीची बैठकरावणवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन.
प्रतिनिधी. 23 ऑक्टोबर
गोंदिया : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 26 व 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री.आत्राम 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.45 वाजता अहेरी येथील राजवाडा निवासस्थानापासून प्राणहिता हेलिपॅडकडे जातील. 9 वाजता हेलिकॉप्टरने देवरी जिल्हा गोंदियाकडे प्रयाण.
सकाळी 10 वाजता पालकमंत्र्यांचे देवरी हेलिपॅड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता शासकीय विश्रामगृह देवरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती.
शासकीय विश्रामगृह देवरी येथे दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत आरक्षण. दुपारी 1 ते 3 या वेळेत तहसील कार्यालय देवरी येथे जनता दरबार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता देवरी येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण व दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5 ते 6.45 गोंदिया येथे आरक्षण. सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व विसावा.
27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून मोटारीने रावणवाडीकडे प्रयाण. सकाळी 10.00 ते 11.30 रावणवाडी पोलीस स्टेशन येथे आगमन व रावणवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन व पोलीस दलास चारचाकी वाहन समर्पण समारंभास उपस्थिती.
सकाळी 11.30 वाजता रावणवाडी येथून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पोहोचून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होतील.
दुपारी 3.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व हेलिकॉप्टरने प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व अहेरी, राजवाडा निवासस्थानाकडे प्रयाण.