गोंदिया: नूतन वर्षे महिलांसाठी सर्वात जास्त आनंदायी येणार – ना. अदिति तटकरे | Gondia Today

Share Post

गोंदिया। जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. येणारे नुतन वर्षी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी विविध योजना आणण्यासाठी कटिबद्ध असल्याने येणारे वर्षे महिलांसाठी अधिक आनंददायी ठरणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री ना.आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी गोंदिया येथे आयोजित कार्यकर्ता भेट कार्यक्रमात केले.

IMG 20231224 WA0028

आज एन.एम.डी महाविद्यालय सभागृहात महिला व बालकल्याण अधिकारी, बचत महिला पदाधिकारी, महिला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचे भेट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ना.आदिती सुनिल तटकरे, प्रमुख अतिथी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री गंगाधर परशुरामकर, श्री प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, श्री निखिल जैन, पुजा अखिलेश सेठ, श्री सुरेश हर्षे, श्री केतन तुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.आदितीताई तटकरे यांना गोंदिया शिक्षण संस्था द्वारे स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.

IMG 20231224 WA0031

माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करताना महायुतीचा कार्यप्रणाली व महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती सांगितली.

ना.आदितीताई तटकरे पुढे म्हणाल्या की, आज महिला हे राजकीय नेतृत्व ठरवित आहेत. त्यांची भुमिका अतिशय महत्त्वाची आहे. महिला राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्वाची भुमिका वठवित आहे. शासनाच्या विविध योजना ह्या महिलांसाठी विकासाची पर्वणी आहे. अंगणवाडी सेविका यांच्या समस्या लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रास्ताविक भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष डॉ.माधूरी नासरे यांनी महिलांच्या समस्या व अंगणवाडी सेविका यांचे महत्वाचे योगदान सांगितले.

IMG 20231224 WA0030

त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत गुंतवणूक प्रमाणपत्र रापेवाडा येथील कु.काव्या सतीश येडे, नंगपुरा मुर्री चे खुशबू ओंमेद्र रहांगडाले, कायरा ओंमेद्र रहांगडाले, कांरजा चे कु.आरोही सुमित डोंगरे, कु.अमिराह अब्दुल शुभेदार, तुमखेडा चे कु.हिना सुरेंद्र मंडिया लाभार्थी यांना पंचवीस हजार रुपयेचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प 2अंर्तगत गुंतवणूक प्रमाणपत्र, एफ.डी ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी अश्विनीताई पटले, नेहाताई तुरकर, श्रीमती. सविता मुदलियार, सुशीला भालेराव, रजनी गौतम, कुंदा दोनोडे, सरला चिखलोंडे, कीर्ती पटले, लता रहांगडाले, पुष्पकला माने, श्रीमती. अनिता चौरवार, श्रीमती कुंदा पंचबुद्धे, श्रीमती. मोनिका सोनवणे, दीपा काशिवाल, ज्योत्स्ना सहारे, रुचिता चौहान, उमेश्वरी चुटे, रूपा श्रीवास्तव, मोनिका सोनवणे, पायल बग्गा, पायल भेलावे, संगिता माटे, स्वाती शर्मा, माधुरी परमार, सरिता बारईकर, नयना समुद्रे व मोठ्या संख्येने एनसीपीच्या अंगणवाडी सेविका पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सुशीला भालेराव यांनी संचालन केले तर कुंदा दोनोडे यांनी आभार मानले.