गोंदिया: धान खरेदीकरीता शेतकऱ्यांची NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु | Gondia Today

Share Post

शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक..

गोंदिया, दि.17 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीकरीता NEML पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2023-24 पासुन ज्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत खरेदी केंद्रावर मुदतीत धान विक्रीसाठी नोंदणी पूर्ण करावीत.

नोंदणीसाठी मंजुर खरेदी संस्थांची यादी पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया, खातीया (परसवाडा), मुंडीपार (MIDC), कामठा, गणखैरा, गोरेगाव, कालिमाटी (गोरेगाव), सर्वाटोला, गोंदेखारी, नवेझरी, विहिरगाव, वडेगाव, आमगाव, गोरठा, कालिमाटी (आमगाव), अंजोरा, कट्टीपार, सुपलीपार, वळद, तिगाव, हरदोली, पांढरी, कोटजांभोरा, सौंदड, अर्जुनी/मोरगाव (लक्ष्मी), नवेगावबांध, अर्जुनी/मोरगाव (ख.वि.), बाकटी, बोंडगाव देवी, धाबेटेकडी, महागाव, वडेगाव रेल्वे इत्यादी मंजुर आधारभुत धान खरेदी केंद्रावर खरीप पणन हंगाम 2023-24 मधील 7/12 उतारा, पीक पेरा असलेला, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र सोबत घेऊन जावे व विहित मुदतीत नोंदणी करावी. बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनीच मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.एस.इंगळे यांनी केले आहे.