गोंदिया। रामदेवरा मंदिर सभागृह, रेलटोली गोंदिया येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गोंदिया व जेष्ठनागरीक सेवा संघ व्दारा स्नेहमिलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, सहाय्यक उपायुक्त विनोद मोहतुरे, माजी आमदार रमेशभाऊ कुथे, सेवानिवृत्त उपायुक्त अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
गोंदिया शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अनिल देशमुख, नारायण प्रसाद जमईवार, लखनसिंग कात्रे, दुलीचंद बुद्धे, लीलाधर पाथोडे, माधुरी नासरे, अनुप शुक्ला, संजय रहांगडाले, सुरेश वाघाये, शशिकांत कन्हाई, रमेश चामट, मुन्नालाल यादव, शरद क्षत्रिय, सुनील भाजे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसंग….