उद्या रामनगर येथे मुस्लिम महिलांचे भव्य महिला संमेलन. | Gondia Today

Share Post

गोंदिया। (2फरवरी)

राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम महिला बचत गटाच्या वतीने 3 जानेवारी रोजी मनोहर कॉलनी रोड, रामनगर येथे भव्य महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रामनगरमध्ये मुस्लिम महिलांतर्फे प्रथमच महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता फुले, साहू, आंबेडकर यांच्या विचारांनी संमेलनाला सुरुवात होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हा दंडाधिकारी स्मिता बेलपात्रे, एसडीओ पर्वणी पाटील, होम डीवायएसपी नंदिनी चाणपूरकर, अध्यापन अधिकारी कादर शेख, रामनगर पोलीस स्टेशनचे पीआय संदेश केंजळे, मोनिता चौधरी, तहसीलदार शमशेर संघे-पाठणकर, डॉ. माविम, रोहिणी साखरे.-माविम, प्रमुख मार्गदर्शक मोहसीन खान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महिला संमेलनाचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुस्लिम महिला बचत गट रामनगरच्या अध्यक्षा नजमा कुरेशी, शमीम अली, नसरीन कुरेशी, नाजनीन शेख, अमरीन कुरेशी, अस्मा शेख, फिरोझा कुरेशी, रेश्मा शेख, शमा शेख, शगुफ्ता अली यांनी केले आहे.