महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार – माजी आमदार राजेंद्र जैन | Gondia Today

Share Post

IMG 20241128 WA0040IMG 20241128 WA0040

रस्ता अर्जुनी. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये प्रचंड यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सडक/अर्जुनी च्या वतीने तेजस्विनी लॉनं येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

IMG 20241128 WA0041IMG 20241128 WA0041

महाराष्ट्र विधानसभेची नुकतीच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पार पडली यात जनतेने दिलेला कौल विकासासाठी व प्रगतीसाठी असून पुढेही लोककल्याणाची कामे करीत राहू, दोन्ही जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदार बंधू – भगिनी व सर्व जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. आगामी काळात पक्ष मजबुतीसाठी कार्यकर्ताशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर द्यावी तसेच पक्ष संघटन बांधणी करावी.

बैठकिला सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, अविनाश काशिवार, सुधाताई रहांगडाले, तेजराम मडावी, रजनी गिऱ्हेपुंजे, वंदना डोंगरवार, रमेश चुर्हे, गजानन परशुरामकर, शिवाजी गहाणे, डी.यु. रहांगडाले, दिनेश कोरे, जुबेर शेख, भय्यालाल पुस्तोडे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment