येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत खा. प्रफुल पटेल यांच्या निर्णयाशी खंबीरपणे उभे राहू – राजेंद्र जैन | Gondia Today

Share Post

वार्ताहर।

गोंदिया। आगामी विधानसभा व नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत खासदार श्री प्रफुल पटेलजी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी खंबीरपणे उभे राहू. संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत असतो त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या दोन्ही निवडणूक ह्या आपल्या मधूनच लढायच्या आहेत. शहरात अनेक समस्या आहेत त्या जनतेच्या निदर्शास द्या. जनतेची छोटे – मोठे कामे करा, पक्षाशी लोकांना जोडण्याचे कार्य करावे. आपसी मतभेद, हेवेदावे विसरून पक्षासाठी काम करा उमेदवार कुणीही असो त्याला निवडून आणण्याची शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यात असली पाहिजे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा संघटन मजबूत असेल असे माजी आमदार श्री राजेंद्र जैन कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.

IMG 20240711 WA0031IMG 20240711 WA0031

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, प्रदेश सचिव श्री विनोद हरिणखेडे, जिल्हाध्यक्ष श्री प्रेम रहांगडाले, शहर अध्यक्ष श्री नानू मुदलियार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला प्रभागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन व विस्तार संबंधी चर्चा करण्यात आली. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आगामी विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत संमर्पण वृत्तीने काम करण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.

श्री जैन पुढे म्हणाले की, महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी – लाडली बहन योजना, मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षण, एस टी बस मध्ये ५० टक्के सवलत, श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, गोंदिया येथे मेडिकल महाविद्यालय, गोंदिया व आसपासच्या परिसरातील जनतेला प्रवासाच्या सुविधेकरिता रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, विमान सेवा सुरु झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापाराला चालना मिळाली आहे. अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

सर राजेंद्र जैन, प्रेम रहांगडाले, विनोद हरिणखेडे, नानू मुदलियार, रफिक खान, अशोक सहारे, केतन तुरकर, विनीत सहारे, सतीश देशमुख, विनोद पांढरे, प्रेम जैस्वाल, गोपीचंद थवानी, मनोहर वालदे, राजेश दवे, टिळक पाटील, विजेंद्र पाटील, मंजुळ पाटील आदी उपस्थित होते. सिंग, राजकुमार जैन, हरगोविंद चौरसिया, रवी मुंधरा, संजीव राय, चंद्रकुमार चुटे, आनंद ठाकूर, विनायक खैरे, मनोज जोशी, महेश करियार, लवली होरा, जयंत कच्छवाह, मीनू बग्गा, मनीष कापसे, राजू भगत, नागनाथ, नागनाथ, व्ही. , विनायक शर्मा , हरिराम आसवानी , हरबक्ष गुरनानी , संजीव बापट , सय्यद इक्बाल , राजेश कापसे , झंकलाल ढेकवार , राकेश दोडानी , सुनील धुवरे , बाळू कोसरकर , त्रिलोक तुरकर , सौरभ जैस्वाल , दीपक मूलचंदानी , हर्षवर्धन मेश्राम , सुनील उष्मांक , शशिकांत शर्मा , सुनील ढेकवार . सहारे, परम सिंग, अरविंद चौरसिया, निशांत दीप, हिमांशू दुबे, प्रशांत सोनपुरे, दर्पण वानखेडे, अविनाश महावत, शरभ मिश्रा, गौरव शेंडे, बन्ना राव, जयपाल ठवकर, राजू पाचे, अतुल शेंडे, राहुल शेंडे, विकास साहू, जितेंद्र तिवारी, सुनील भागे, महेश कोठारी, अतुल दुबे, खुशाल कात्रे, सोहनलाल गौतम, नीरज पटले, वामन गेडाम, नरेंद्र बेळगे यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.