गोंदिया,दि.25 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गोंदिया जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागात 1 लाख 57 हजार 942 ऑफलाइन तर 1 लाख 76 हजार 428 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 370 महिलांनी अर्ज भरले आहेत.
अर्ज भरण्याची सुविधा जिल्ह्यात विविध ठिकाणी उपलब्ध आहे. महिलांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पात्र महिला ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. यानंतर जुलैपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ जमा केला जाईल. ‘नारी शक्ती दूत’ ॲपद्वारेही या योजनेसाठी अर्ज भरता येईल.
अंगणवाडी व सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. यामध्ये दि कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि अविवाहित महिलांना याचा लाभ मिळेल. या योजनेचा अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपद्वारेही भरता येईल.
या योजनेत नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे, वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, परंतु पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी एक पुरावा स्वीकारला जाईल: १५ वर्षापूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र/ १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म प्रमाणपत्र. जर इतर राज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केले असेल, तर खालीलपैकी एक कागदपत्र स्वीकारले जाईल: पतीचे अधिवास प्रमाणपत्र/१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/१५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्राजित नायर यांनी केले आहे.