राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी पदाधिऱ्याची आढावा बैठक संपन्न..
प्रतिनिधी.गोंदिया। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी/ मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक एरिया 51, कोहमारा येथे माज़ी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या वेळी खा. प्रफुल पटेल, महिला व बाल कल्याण मंत्री ना.अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 डिसेंबर २०२३ ला, तेजस्विनी लॉनं सडक/अर्जुनी येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या जय्यत तैयारीबाबद चर्चा करण्यात आली.
या मेळाव्याला जास्तीत – जास्त संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख मान्यवरांनी केले.
या बैठकीला राजेंद्र जैन, श्री मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, सुधाताई रहांगडाले, डॉ रुकीराम वाढई, शिवाजी गहाणे, डी.यु.रहांगडाले, रजनी गिऱ्हेपुंजे, रिताताई लांजेवार, कल्पना बहेकार, प्रमिला थोटे, गेडाम ताई, पुष्पमाला बडोले, वाढीवेताई, गुणवंता कापगते, दानिश साखरे, भोलानाथ कापगते, माधव हटवार, ईश्वर कोरे, वासनिकजी सरपंच, मुनीश्वर कापगते, आस्तिक परशुरामकर, श्री चुटेजी, श्री राहुल यावलकर, शालिक हातझाडे, आर.के. जांभुळकर, योगराज हलमारे सहीत प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिति होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा गोंदिया जिल्हा दौरा कार्यक्रम
गोंदिया, दि.21 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हया शनिवार 23 डिसेंबर 2023 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दुपारी 2.15 वाजता मोहाडी, जि.भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथून शासकीय वाहनाने सडक अर्जुनी कडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता सडक अर्जुनी येथे आगमन व महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वाजता सडक अर्जुनी येथून शासकीय विश्रामगृह नागपूरकडे प्रयाण.