

गोंदिया. 26 जुलै
माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.परिणय फुके यांनी आज शहरात विविध आरोग्य सुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक मशिन्सनी सुसज्ज असलेल्या त्रिशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली.
आमदार श्री.फुके यांनी आधुनिक आयसीयू कक्ष असलेल्या ३० खाटांच्या रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य सुविधांचे कौतुक केले तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही भेट घेतली.
आमदार फुके यांचे आगमन होताच रिबन कापून आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार फुके यांचे आगमन होताच त्यांचे रुग्णालयाचे संचालक मंडळ व डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ.जयस्वाल, डॉ.जयंती पटले, सुनील केनलका, भालचंद्र ठाकूर, डॉ.राजेश कात्रे, डॉ.रंगारी, डॉ.ममता रंगारी, अभय अग्रवाल, राहुल अग्रवाल यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.