प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने 22 ला गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन.. | Gondia Today

Share Post

2023 8image 07 47 534439141shriramjanmabhoomi2023 8image 07 47 534439141shriramjanmabhoomi

गोंदिया। येत्या 22 जानेवारीला पावन नगरी अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्याने गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्राणप्रतिष्ठा निमित्याने आयोजित भक्तिमय संगीत, महाआरती, विविध कार्यक्रमामध्ये माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.

यात सकाळी ७.३० वाजता श्रीराम दौड, नेहरू चौक,
प्रफुल्ल पटेल मित्र परिवारातर्फे राजीव गांधी चौक, शासकीय विश्रामगृहाजवळ सकाळी ११.०० वाजता प्राणप्रतिष्ठा लाईव्ह (एलईडी) कार्यक्रम, दुपारी ०३.०० वाजता श्री रामचंद्र दमाहे व संच यांचा रामभक्त संगीतमय कार्यक्रम, सायंकाळी ६.०० वाजता संगीतमय श्री रामचंद्र दरबार दर्शन, सायंकाळी ६.०० वाजता राम यात्रा. सायंकाळी 07.00 वाजता भव्य आतषबाजी, 08-00 वाजता भगवान श्री राम महा आरती व महाप्रसाद, दुपारी 12.00 वाजता सीताराम मंदिर (अग्रसेन गेट) येथे आरती, दुपारी 02-00 वाजता मनोकामना सिद्धी हनुमान मंदिर, फुलचूर येथे कार्यक्रम, दुपारी 30 वाजता माकमाची आरती . 05-00 वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर कोरणी घाट येथे महा आरती, सायं. 07-00 वाजता हनुमान नगर, चौरागडे शाळा येथे महाआरती, रात्री 10.00 वा. सायंकाळी 07-45 वाजता बसस्थानकाजवळ महाआरती, रात्री 08-15 वाजता कार्निव्हल महोत्सव, सर्कस मैदानावर महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.