

प्रतिनिधी. 03 जुलै
गोंदिया. राज्यातील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी कार्यामुळे प्रभावित होऊन सर्वसामान्यांचा कल आता शिवसेनेकडे झपाट्याने वाढत आहे. गोंदिया जिल्ह्यातही शिवसेना विकासकामांबरोबरच पक्षाची ताकदही झपाट्याने वाढवत आहे.
नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगार सेना गोंदिया जिल्हाप्रमुख खुशाल मुरलीधर नेवारे यांनी रेल्वे कामगार सेनेचा विस्तार करताना आज 22 मुकरदमांची शहरप्रमुख, शहर उपप्रमुख, व प्रभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
हे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिले. विशेष म्हणजे कामगार सेनेच्या अंतर्गत प्रत्येक मुकरदममध्ये 30 जण आहेत. या पार्श्वभूमीवर 660 जणांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
कामगार सेनेअंतर्गत झालेल्या या नियुक्तीबद्दल श्री शिवहरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव कटिबद्धपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
नियुक्ती समारंभात शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, शिवसेना रेल्वे कामगार गोंदिया जिल्हाप्रमुख खुशाल मुरलीधर नेवारे, रेल्वे कामगार गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष धर्मेश नेवारे, शहरप्रमुख राजेश पाचे, शहर उपाध्यक्ष व इतर प्रभाग अध्यक्षांची उपस्थिती होती.