गोंदिया. महापुरुष क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती गोंदीटोला (गोंदिया) येथे कुडवा, कटंगीकला, वीर बिरसा मुंडा उत्सव आयोजन समितीतर्फे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री राजेंद्र जैन उपस्थित होते. राजेंद्र जैन जननायक यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांचे संघर्षमय जीवन आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार सर्वश्री राजेंद्र जैन यांच्यासह बाळकृष्ण पटले, सौ पुजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, मोहिनीताई वराडे, विनोद बिसेन, राहुल मेश्राम, रोहित अग्रवाल, पवन पटले, अनिल जगनीत, नूतन वाडेगावकर, विमलाबाई उईके, कमलताई श्रीभद्रे, डॉ. अभिषेक मॅडम.. रवि इवनाते, निखिल इवनाते, आकाश पार्टेती यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.