गोबरवाही, सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गोबरवाही ते चिचोली दरम्यान नागझिरा जंगलात दोन मोटारसायकलची धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. डोंगरीबुजुर्ग येथील रहिवासी दिनेश मोहन कुंभलकर (40) हे तुमसरकडे जात होते, तुमसर इंदिरा नगर रहिवासी प्रवीण सोनवणे (46) हे गोबरवाहीकडे येत असताना त्यांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली, दोन्ही जखमी मोटारसायकलस्वारांना तुमसर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृत्त पाठेपर्यंत एकाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.