20 वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रसर सरपंच नरेन्द्र चौरागडे “लोकमत गोंदिया जिल्हा भुषण” पुरस्काराने सन्मानित.. | Gondia Today

Share Post

गोंदिया- प्रतिनिधी.
गोरेगाँव तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत चे युवा सरपंच आणि गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे यांना लोकमत गोंदिया जिल्हा भुषण पुरस्काराने २९ जुन ला नागपूर येथील तुली इंपोरियल हॉटेल येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोळे, गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेवराव किरसान, लोकमत मिडिया गु्रूपचे चेयरमेन विजयबाबु दर्डा व मराठी सिनेतारका ( अभिनेत्री) अमुर्ता खानविळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पत्र व मोमेन्ट पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

नरेंद्र कुमार चौरागडे हे मागील वीस वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात राहून समाजातील गोरगरीब जनतेच्या विविध प्रकारांच्या समस्यना वाचा फोडण्याचे व गाव विकासासाठी सदैव अग्रेसर राहिले.

IMG 20240701 WA0017IMG 20240701 WA0017

ते सन २००७ ला प्रथमताच मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच पदी विराजमान झाले. याकार्यकाळात गावातील विविध रोड रस्ते सिमेंटीकरण करणे, शासनाच्या विविध योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले शेतकरी बांधवांना शेती मधे जाण्यासाठी पांदन रस्त्यावर माटी काम व मुरूम करण्याचें कामे सर्वात जास्त प्रमाणात झाले. चौरागडे पुन्हा २०१२ मधे ग्रांम पंचायत सदस्य निवडून आले. त्यांनी बचतीतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग शोधून गावातील विविध क्षेत्रातील लोकांना घेऊन स्वाभिमान बचत गटाची स्थापना केली व आज घडीला बचतगटाची उलाढाल विस लक्ष रूपये ची दिसुन येत आहे. या बचतगटाच्या माध्यमातून गावातील, समाजातील गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करण्यात येत असते.

सन २०२२ मधे थेट जनतेतून पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच पदांवर विराजमान झाले. ते मागील दिड वर्षांपासून गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुध्दा आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन लोकमत मिडिया ग्रुप ने लोकमत गोंदिया जिल्हा भुषण पुरस्काराने त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.