व्यसनापासून सतमार्गी लावण्याचे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य मोलाचे – सौ.वर्षाताई प्रफुल पटेल | Gondia Today

Share Post

IMG 20231220 WA0038

प्रतिनिधी. 20 डिसेंबर

गोंदिया। आज ग्राम कवलेवाडा/शहरवानी ता. गोरेगाव येथे परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या गोंदिया शाखेच्या वतीने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व हवनकार्य आयोजित करण्यात आले होते.

IMG 20231220 WA0037

व्यसन मुक्त समाज घडविण्यात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य मोलाचे आहे. परमात्मा एक सेवक मंडळ महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य उत्तम पणे पुढे नेत आहेत. व्यसनमुक्त समाज घडविण्यात या मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या मंडळाच्या कार्यामुळे अनेक कुटुंब सतमार्गी लागले आहे तसेच सेवकांचे जिवनमान उंचावत चालले आहे. खऱ्या अर्थाने मानव धर्म व समाज निर्मिती मध्ये परमात्मा एक सेवक मंडळ फार पुढे आहे असे प्रतिपादन सौ वर्षाताई प्रफुल पटेल यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी राजूजी मदनकर, टिकाराम भेंडारकर, संजय चाचेरे, केतन तुरकर, प्रवीण उराडे, संजय महाकाळकर, श्रीधर चन्ने, सिताराम नेवारे, महेश मौजे, कैलास मौजे, योगेश भुरे, प्रकाश भुरे, रौनक ठाकूर, गुलाब बोपचे, नानू ठाकरे, जयराम कांबळे, भीमराव कांबळे, राजू भगत, हेमंत बोपचे, नितेश गेडाम सहित असंख्ये परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक उपस्थित होते.