शेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके | Gondia Today

Share Post

Polish 20231219 000726357 174001 CS 6037

धन्यवाद सरकार !! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस..

१८ डिसेंबर/नागपूर:
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी २७ हजार रुपये हेक्टर व बिगर ओलीताखाली (कोरडवाहू) शेतीसाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली असून ३ हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे यामुळे ८१ हजार पर्यंतची मदत शेतकऱ्यांना मिळणार.

माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार सर्वांच्या हिताचे काम करत आहे. राज्य सर्वांगीण विकासाच्या दिशेने पावले टाकत आहे.