तिरोडा: नुकतेच 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा तिरोडाचे माजी आमदार दिलीपभाऊ बनसोड यांच्या वडिलांच्या शोकात सामील होण्यासाठी आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी ठाणेगाव येथील बनसोड कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वना भेट घेतली.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांचे वडील श्री वामनरावजी बनसोड यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी ठाणेगाव येथे दुःखद निधन झाले होते.
या दु:खद घटनेचे वृत्त समजताच माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी बनसोड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन आज दि.30 डिसेंबर रोजी दिलीपभाऊ बनसोड यांच्या ठाणेगाव येथील निवासस्थानी शोक संवेदना व्यक्त केली. श्री वामनरावजी बनसोड यांच्या तैलचित्रावर पुष्प अर्पण करून दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
अभियंता देवेंद्र तिवारी, सुनील केळंका, ओम कात्रे, जिप सदस्या माधुरीताई रहांगडाले, भाऊराव कठाणे, भाऊराव जी बनसोड, सरपंच ठाणेगाव आय.टी पटले, विक्की जगणे, शीतल तिवडे, खोब्रागडे सर, मेश्राम सर, बनसोड सर, महेंद्र सूर्यवंशी, शुभारंभ पाटील, सरपंच ठाणेगाव आय.टी. , विशाल बनसोड, अविनाश मेश्राम, स्वप्नील बनसोड, सत्यशील बनसोड व बनसोड कुटुंबीय उपस्थित होते.