

गोदिया : उद्या २७ जुलै रोजी या भागाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल वाढदिवसानिमित्त त्यांच्या गोदिया येथील निवासस्थानी उपस्थित राहून हितचिंतकांची भेट घेणार आहेत.
वाढदिवसानिमित्त गोदिया विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची विशेष परिषद दुपारी 01.00 वाजता पोवार समाज सोशल हॉल (पोवार बोर्डिंग), रेलटोली येथे होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा प्रशिक्षक अनिल सहारे यांच्या पुढाकाराने लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आवाहन अपूर्व अग्रवाल, शहर भाजपा अध्यक्ष अमित झा, तालुका भाजपा अध्यक्ष धनलाल ठाकरे, तालुका सरचिटणीस अर्जुन नागपुरे, शहर सरचिटणीस अकित जैन, मनोज पटनाईक आदींनी केले आहे.