गोंदिया, दि.23 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९ वाजता देवरी येथे आगमन भाजपा कार्यालयाला भेट, १०.३० वाजता कचारगड येथे आगमन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, ११.३० वाजता कचारगड येथून सालेकसासाठी प्रयाण, दुपारी १२ वाजता सालेकसा येथे आगमन व आदिवासी मेळाव्यास उपस्थिती.
दुपारी २ वाजता सालेकसा येथून आमगावकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता बिरसी ता.आमगाव येथे आगमन व शासकीय मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता देवरी येथे आगमन व सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह देवरी येथे आगमन व मुक्काम. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सोईनुसार गडचिरोलीकडे प्रयाण.