मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम**
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. चक्रधर स्वामी आश्रमात सेवकांना कंबल व फल वाटप करण्यात आले. तसेच सुकडी गावात ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार-प्रसार करण्यात आला.
जिल्हा परिषद हायस्कूल सुकडी येथे विद्यार्थ्यांसोबत भारताचे संविधान वाचन करण्यात आले, तर रविंद्रनाथ टागोर वरिष्ठ माध्यमिक आश्रमशाळा, मेंढा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्र भगत, युवक जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संदीप मेश्राम, तालुकाध्यक्ष कैलाश पटले, तिरोडा शहराध्यक्ष ममता बैस, जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे, किरण पारधी, पंचायत समिती सदस्य विजय बिंझाडे, जितेंद्र चौधरी, रिता पटले, भिवापूर सरपंच राजकुमार ठाकरे, सुकडी ग्राम पंचायत सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच संदीप कुर्वे, वनमाला डाहाके, दुर्गा रेहकवार, अशोक भगत, मुन्ना बिंझाडे, अशोक पटले आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमांतून समाजातील विविध घटकांना मदत करण्याची आणि संवेदनशीलता वाढविण्याची संधी मिळाली. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये संविधान वाचनाच्या उपक्रमातून देशाच्या संविधानाबद्दल जागरूकता वाढली. वृक्षारोपण कार्यक्रमाने पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या सर्व उपक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यात सहभाग घेतल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.