
प्रतिनिधी. 10 डिसेंबर
गोंदिया. भारतीय जनता पक्षात सक्रीय काम करणाऱ्या गोंदिया येथील राकेश अग्रवाल या तरुणाला भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे यांनी राकेश अग्रवाल यांची गोंदिया जिल्हा भाजपच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून, अनेक वर्षांपासून विद्यार्थी परिषद, बीजेवायएममध्ये सक्रिय कार्यकर्ता राहून पक्षाप्रती आपली भूमिका बजावली आहे.
पक्षाकडून भाजप जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्यावर राकेश अग्रवाल यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते, भाजप जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व पक्षाची विचारधारा अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.