तिरोडा येथे जेष्ठ नागरिक संघ व लायन्स क्लबच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

Share Post

तिरोडा येथे जेष्ठ नागरिक संघ व लायन्स क्लबच्या वतीने सत्कार सोहळा संपन्

तिरोडा – आज तिरोडा येथे जेष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब *पॉवर सिटी* आणि *रॅंकि केंद्र* यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून कु. आदिती बैस, श्री समीर पारधी, पंडित नंदकिशोर जी आणि अॅड. देवेन्द्र चौधरी यांचा त्यांच्या उल्लेखनीय उपलब्धींसाठी सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला तिरोडा पोलीस निरीक्षक श्री. अमित वानखेडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. नारायण जमईवार, लायन्स क्लब तिरोडाचे अध्यक्ष डॉ. संदीप मेश्राम, डॉ. योगेंद्र भगत, अॅड. अजय यादव, अॅड. माधुरी रहांगडाले, बन्सीलाल जी ठाकूर, नंदेश्वर सर, अशोक मिश्रा, अलकेश मिश्रा, सुरेश ग्यानचंदानी, प्रकाश ग्यानचंदानी, संजय जांभुळकर, बबल्यू बैस, संजय बैस तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व लायन्स क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामुळे सामाजिक सन्मानाची परंपरा अधिक दृढ झाली असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.