यश प्राप्ती साठी संघटन महत्त्वाचे – माजी आमदार राजेंद्र जैन | Gondia Today

Share Post

गोंदिया। गोंदिया तालुक्यातील ग्राम कन्हारटोला, बघोली, कलारीटोला व बाजारटोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून विविध समस्यां जाणून घेतल्या त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

IMG 20240730IMG 20240730

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका याबाबत म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा प्रगती साठी सिंचन व रोजगार उपलब्ध करणे व अन्य विकासाचे काम होत आहेत. याच जबाबदारीच्या दृष्टीकोनातून आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत बूथ कमेटीची सर्वात मोठी जिम्मेदारी आहे. गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत असेल तरं यश नक्की मिळेलच असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.

या वेळी राजेंद्र जैन, कुंदन कटरे, गणेश बर्डे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, रवी पटले, रजनी गौतम, सुनील पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर, धर्मेंद्र परिमल, कालू चौहान, संभू असाटी, भुवन हलमारे, नरेंद्र तेलसे, टिळकचंद खांडवडे, डॉ. राम चरण बिसेन, पुरुषोत्तम तेलसे, संतोष पाचे, रवी तेलसे, भागवत खांडवाहे, राजेश तेलसे, अनंतराम खांडवाहे, सोमाजी नेवारे, रामकिशोर तेलसे, राकेश तेलसे, ए.आर. तेलसे, सुखचंद नेवारे, मनोहर तेलसे, तेमनलाल तेलसे, कलंडल तेलासे. अजय जमरे, मकसूद कुरेशी, भरतलाल राऊत, टेकलाल बकत, महेश नेवारे, इस्माईल शेख, मेहमूद कुरेशी, कलाम शेख, राजेश नेवारे, जावेद शेख, युसूफ शेख, कमलदास, पारस डोंगरे, उमराव सोनवणे, संजू पारधी, नामदेव तुरकर, ओम. , राहुल चौधरी, निखिल पांढरे, ऋतिक पटले, दुलीचंद उईके, पवन पारधी, मोहित पटले, धर्मेंद्र तुरकर, समीर पारधी, रितेश पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कामगार उपस्थित होते.

Leave a Comment