जनहिताच्या योजनाबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत, ही योजना अविरल चालू राहणार- खा. प्रफुल पटेल | Gondia Today

Share Post

माजी जिल्हा परिषद सभापती भुसारी आणि टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

पवनी। आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खा. प्रफुल पटेल संबोधित करतांना बोलत होते.

IMG 20241009 WA0054IMG 20241009 WA0054

यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या भागातील शेतकरी हा विद्युत पंपाच्या सहाय्याने धान व अन्य पिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात. माझ्या शेतकरी बांधवांची व्यथा समजून घेत त्यांच्या कृषी पंपाचे विज बिल माफ तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २५ हजार रुपये बोनस देण्याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांच्या बँक खात्यात पैसे येणे सुरु झाले आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणात निशुल्क प्रवेश, युवकांना युवा कार्य प्रशिक्षण च्या माध्यमातून पाठबळ देणे, बांधकाम कामगारांसाठी योजना अश्या अनेक योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत. जन हिताच्या योजनाबाबत विरोधक भ्रम निर्माण करून गुमराह करतात योजना बंद होणार, परंतु योजना बंद होणार नाहीत. या योजना अविरत सुरु ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत साथ द्या असे आवाहन श्री प्रफुल पटेल यांनी केले.

सर्वश्री नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंदे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, विजय सावरबांधे, हरीश तलमले, शैलेश मयूर, मुकेश बावनकर, लोकेश वैद्य, चेतन डोंगरे, छोटू बाळबुधे, जितू नखाते, किशोर पालंदेकर, ललित पांडुरंग, ललित शेंडे आदी उपस्थित होते. कुर्ढेकर, नंदू कुर्ढेकर, सीमा गिरी, मनोज कोवसे, हेमंत श्रुगनरपवार, शोभना गोरशेट्टीवार, हेमंत महाकाळकर, सोनू रंगारी, हेमंत मेंवडे, चरण पलवार, टिंकू सेलोकर, विजय ठक्कर, पुष्पा भुरे, जयशिला भुरे, जयशिला नुवाडे, नुवाडे खान, सोनू रंगारी, काहीजण उपस्थित होते. प्रेमसागर गजभिये, गोपाल करिहार, देवांगना गजभिये, संविधान नवनागे, शुभम गजभिये, मोरेश्वर लांजेवार, सय्यद परवेज, यशवंत लांजेवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment