

गोंदिया. महाराष्ट्रात आज महायुतीचे सरकार स्थापन झाले. माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, आदरणीय श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय श्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
नवीन महायुतीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्वांचे स्वागत, अभिवादन व अभिनंदन केले व खासदार आदरणीय श्री प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया व भंडारा जिल्ह्याचा विकास वेगाने होईल असा आशावाद व्यक्त केला.
जैन म्हणाले, लोकहिताचे काम करणारे हे भक्कम बहुमताचे सरकार असून यातून राज्याला सक्षम नेतृत्व मिळेल आणि नव्या संकल्पनेतून जनहिताची कामे केली जातील.