

प्रतिनिधी.
गोंदिया. गोंदिया शहराच्या उत्तर भागातील रिंगरोडवरील वर्दळीचा चौक असलेल्या अवंती चौक येथे अनेक अपघात होत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले तसेच वाहतूक नियंत्रण बूथचेही उद्घाटन करण्यात आले.
विशेष म्हणजे राणी अवंती चौक हा रिंगरोड संकुलातील अतिशय वर्दळीचा चौक आहे. येथून चारही दिशांनी वाहतूक आहे. रिंगरोडवर अवजड वाहतूक आणि मोठ्या वाहनांची ये-जा यामुळे अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका महिलेला जीव गमवावा लागल्याने स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून येथे ट्रॅफिक सिग्नलची मागणी केली होती. ज्याची दखल घेतली गेली आणि यशही मिळाले.
या ट्रॅफिक सिग्नलच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक नागरिक व समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, वाहतूक पोलीस अधिकारी राहुल पाटील, मनपा अधिकारी चिद्रावार आदींचे आभार मानले.
या उदघाटन प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार) सौरभ रोकडे, समाजसेवक मनोज भांडारकर, ज्येष्ठ नागरिक लिल्हारे जी, बाबा बिसेन, राज शुक्ला, विलास मेश्राम रॉजर फंडीस, अक्षय कुंभलवार आदींसह नागरिक उपस्थित होते.