सभासद नोंदणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा – खा. प्रफुल पटेल | Gondia Today

Share Post

भंडारा। आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या शुभ हस्ते हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

IMG 20250413 WA0007IMG 20250413 WA0007

राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी पार्टी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवून लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणणे, पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील व शहरातील चावडीवर बसून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.

IMG 20250413 WA0006IMG 20250413 WA0006

याप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी समाजकल्याण सभापती हंशाताई खोब्रागडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

IMG 20250413 WA0009IMG 20250413 WA0009

यावेळी खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजूभाऊ कारेमोरे, सुनील फुंडे, धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे, सरिता मदनकर, एकनाथ फेंडर, संजय गुजर, अनिता नलगोपूलवार, रिताताई हलमारे, नेहा शेंडे, देवचंद ठाकरे, हेमकृष्ण वाडीभस्मे, लोमेश वैद्य, नरेश चून्ने, सदाशिव ढेंगे, नरेंद्र झंझाड, विजय सावरबांधे, आनंद मलेवार, नरेश इलमकर, महादेव पचघरे, आशा डोरले, रजनीश बन्सोड, महेंद्र गडकरी, राहुल निर्वाण, रवींद्र वानखेडे, हरीश तलमले, योगेश सिंगनजुडे, धनु व्यास, हेमंत महाकाळकर, राजकुमार माटे, नारायणसिंग राजपूत, परवेज पटेल, उमेश तुरकर, शेखर गभणे, विनय पशीने, आरजू मेश्राम, राजू पटेल, हितेश सेलोकर, रुपेश खवास, अमन मेश्राम, ठाकचंद मुंगूसमारे, मोहन राऊत, राहुल निर्वाण, सोनू खोब्रागडे, मंजुषा बुरडे, अतुल परशुरामकर, आशिष दलाल, विजय खेडीकर, मनीष वासनिक, राजेश वासनिक, नागेश भगत सह जिल्ह्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment