वर्धा | 14 डिसेंबर
वर्धा येथे पार पडलेल्या ओपन स्टेट कराटे चॅम्पियनशिपमध्ये जेंसईरयु कराटे-डो असोसिएशन अंतर्गत श्री पब्लिक स्कूल, तिरोडा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेसह संपूर्ण तिरोडा परिसराचा गौरव वाढवला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत एकूण 15 पदके पटकावली. यामध्ये
🥇 1 सुवर्ण पदक
🥈 5 रौप्य पदक
🥉 9 कांस्य पदक
🥋 पदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे —
प्रियांश विजय नागपुरे – कुमिते प्रकारात सुवर्ण, काता प्रकारात कांस्य
रत्नाकर राधाकृष्ण शेंडे – काता कांस्य
श्लोक सतीश मानकर – काता कांस्य, कुमिते कांस्य
रविस मनोज बघेले – रौप्य पदक
साई समाधान खिरटकर – कुमिते रौप्य, काता रौप्य
अक्षद गोपाल पुडके – काता कांस्य, कुमिते कांस्य
अंशुल जयेंद्र राऊत – काता रौप्य, कुमिते रौप्य
दर्शिल विशाल झरारिया – काता रौप्य, कुमिते कांस्य
हिमांशु मनोज येरपुडे – काता कांस्य, कुमिते कांस्य

या यशाबद्दल शाळेचे संचालक रामकृष्ण शेंडे, मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडे, क्रीडा शिक्षक चंद्रप्रकाश प्रजापती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय यशामुळे श्री पब्लिक स्कूलसह तिरोडा परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 🎉🥋