आदिवासी बहुल गावातील शाळांची पटसंख्या वाढविणाऱ्या प्रातिमा खोब्रागडे ठरल्या आदर्श शिक्षिका

Share Post

तिरोडा (जि. गोंदिया) –

इंग्रजी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळेत नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या प्रातिमा गोविंद खोब्रागडे यांनी आपल्या कार्याने शाळेची प्रतिमा उंचावली आहे.

आलंद्री जिल्हा प्राथमिक शाळेत जून २०१८ पासून मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रातिमा खोब्रागडे यांनी शाळेत विविध प्रयोगशील शैक्षणिक उपक्रम राबवले. परिणामी, आदिवासी बहुल गावातील ही शाळा परिसरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.

त्यांनी स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, ई-लर्निंग मशिन्स, शैक्षणिक व्हिडिओज यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन केले. शाळेत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रयोग, वाचन उपक्रम यांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला.

विशेष म्हणजे, शाळेची पटसंख्या गेल्या काही वर्षांत १०० टक्क्यांनी वाढली. आधी इतर शाळांत जाणारे विद्यार्थी आता आलंद्री शाळेत प्रवेश घेत आहेत. ही कामगिरी प्रातिमा खोब्रागडे यांच्या नावावर मोठ्या अभिमानाने नोंदवली जात आहे.

त्यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेला राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अनेक स्पर्धांत पारितोषिके मिळाली आहेत. मुलांना शिक्षणात रस वाटावा यासाठी त्यांनी लेझीम, कबड्डी, बुद्धिबळ, निबंधलेखन, वक्तृत्वकला अशा स्पर्धांतून सहभाग घडवून आणला.

https://www.ajabgajabb.in/

या सर्व उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल प्रातिमा खोब्रागडे यांना नुकताच ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment