बाबुराव मडावी विद्यालय, देवरी येथे नवरात्र व गरबा महोत्सव २०२५ जल्लोषात साजरा

Share Post

दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवारी तालुक्यातील बाबुराव मडावी विद्यालय, देवरी येथे नवरात्र व गरबा महोत्सव–२०२५ थाटात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आबा एम. पटले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओ. व्ही. चाकोटे यांनी केले.

या महोत्सवात शाळेतील शिक्षक कु. आर. डी. नगपूरे, आर. पी. चव्हाण, एस. एस. वारसंबरे, पी. एस. कडवे, एस. डी. भुमर, जी. आर. कावळे, ओ. पी. विहार आदींचा सहभाग होता.

विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत नवरात्रातील गरबा नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. पालक व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

Leave a Comment