शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढा – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे निर्देश

Share Post

गोंदिया:


शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
अर्जुन मोरगाव येथील जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि कल्याणकारी मागण्यांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीत उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. वेतनवाढ, बदली प्रक्रिया, शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच शिक्षकांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत मागणी करण्यात आली.
भेंडारकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की,
“शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात आणि त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही व्हावी.”
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनाथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटे, शिक्षणाधिकारी महामुनी, तसेच सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भेंडारकर यांनी पुढे सांगितले की,
“शिक्षकांच्या प्रत्येक मागणीचा तातडीने आढावा घेतला जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”

Leave a Comment