आमदार प्रीमियर लीग 3.0: युवाशक्ति स्पोर्ट्स क्लब द्वारे डे-नाइट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन.. | Gondia Today

Share Post

गोरेगांव। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगांव शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब द्वारे आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 3.0 चे आयोजन  करण्यात आलेले आहे. हे गोंदिया जिल्ह्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असून दिवस रात्र क्रिकेट चे सामने होणार आहेत. या भव्य आयोजनाचे आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी रविवारला रात्री आठ वाजेच्या सुमारास विधिवत उद्घाटन पार पडले.

IMG 20250321 WA0019IMG 20250321 WA0019

या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 250000/- रुपये,

द्वितीय पुरस्कार 100000/- आरएस,

तृतीय पुरस्कार 31000/- रुपये असे आहे.

IMG 20250321 WA0017IMG 20250321 WA0017

या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून  गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती चित्रकला चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले, जी.प. सदस्य शैलेश जी नंदेश्वर, जगात महाविद्यालयाचे उपप्राचार्य साहेबलाल भैरम माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले भाजपचे तालुकाध्यक्ष संजय बारेवार माजी पंचायत समिती सदस्य नितीन कटरे माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू बिसेन सामाजिक कार्यकर्त्या उषा रामटेके शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अजय बिजेवार, प्रा. आर.डी. कटरे, हिरा बडगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कृष्णकुमार बीसेन, अरविंद जयस्वाल, कुशनभाऊ चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर आमदार प्रीमियर लीग डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची विधीवत उद्घाटन पार पडले।

IMG 20250321 WA0021IMG 20250321 WA0021

सदर स्पर्धा दिनांक 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान होणार आहे.

या उद्घाटनिय सोहळ्याचे बहारदार संचालन विकास बारेवार तर प्रास्ताविक गोरेगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी केले।

डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीवितेसाठी युवा स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी यासीन शेख,विकास बारेवार,अमोल भेंडारकर, अश्विन रुखमोडे, नमन जैन, राजा कटरे,रवी ठाकरे, पियुष वारेवार, राकेश चौधरी, शदाब पठाण, सिद्धू डोंगरे, नौशाद भाईजान,अजान शेख सर्व अथक परिश्रम घेत आहेत.