

गोंदिया, 4 सप्टेंबर: जम्मू आणि काश्मीर सरकार 20 ऑक्टोबर 2024 रोजी ‘काश्मीर मॅरेथॉन-द ऑटम रेस’ आयोजित करत आहे. एकूण 42 किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किमी अंतराची अर्ध मॅरेथॉन अशा दोन भागात विभागली आहे. या मॅरेथॉनला असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉनची (AIMS) मान्यता मिळाली असून, ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जाची बनली आहे.
मॅरेथॉनमधील विजेत्यांना योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. मॅरेथॉनमध्ये मुख्य विजेत्यासाठी 25 लाख रुपयांचा बक्षीस निधी आहे आणि इतर विविध श्रेणींमध्ये 56 आकर्षक बक्षिसे दिली जातील. हाफ मॅरेथॉनसाठी 15 लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम असून ती पुरुष आणि महिला गटांसाठी स्वतंत्रपणे दिली जाणार आहे.
याशिवाय मॅरेथॉन सुरळीत पार पाडण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारकडून सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. सहभागी कसे व्हावे, नोंदणी शुल्क, रेस मार्गदर्शक तत्त्वे, धावपटूंसाठी मार्ग नकाशे आणि इतर सर्व संबंधित माहिती वेबसाइटवर आढळू शकते. www.kashmirmarathon.jk.gov.in वर उपलब्ध.
या स्पर्धांसाठी धावपटूंसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे. ‘काश्मीर मॅरेथॉन-द ऑटम रेस’मध्ये राज्य व जिल्ह्यातील धावपटूंनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.